पुणे : कसब्याच्या पोट निवडणुकीत तब्बल 47 मते मिळवणारे अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) आता लोकसभेसाठी स्वतःचं नशीब आजमावणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे बहुआयामी कलावंत असलेले सातारकर आता डॉक्टर अभिजीत बिचुकले झाले आहेत, त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ मॅजिक अँड आर्ट्स या विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. याच आनंदात त्यांनी लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढायची हे बिचुकलेंनी अद्याप ठरवलेलं नाहीये. सातारा, कोल्हापूर की पुणे? यापैकी कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार याविषयीची घोषणातील लवकरच करणार आहेत. सदैव चर्चेत असलेले व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीतदेखील लक्ष वेधून घेणार आहेत एवढं मात्र नक्की.
याआधी अभिजीत बिचुकले यांनी साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढली होती. तर 2019 विधानसभा निवडणुकीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात उभे होते. या निवडणुकीत बिचुकले यांना वरळीकरांनी 647 मतं दिली होती. त्यानंतर मागच्याच वर्षी झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले यांना 47 मतं मिळाली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Amar Kale : वर्धा लोकसभेसाठी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब
Loksabha Elections : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराला प्रकाश आंबेडकरांनी दिला पाठिंबा
Pune News : कोथुर्णे गावातील ‘त्या’ चिमुकलीला अखेर 20 महिन्यांनी न्याय मिळाला
Onion Export : 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम; सरकारचा मोठा निर्णय
Lok Sabha Elections : ठरलं! शिवाजीराव आढळराव पाटील ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट
Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना
Lok Sabha Elections : महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ