Bhosari Accident

Bhosari Accident : पीएमटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

951 0

पुणे : पुण्यातील भोसरीमधून (Bhosari Accident) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या पीएमटी बसने एका दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.19) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास भोसरी येथील एमआयडीसी चौकातील कामगार नेते रुपमय चटर्जी पुतळ्याजवळ झाला. याप्रकरणी पीएमटी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बद्रुद्दिन निजामऊद्दीन अन्सारी (वय-49) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत बुद्रुद्दिन यांचा भाऊ ताजऊद्दीन निजामऊद्दीन अन्सारी (वय-46 रा. विकास कॉलनी, लांडेवडी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन पीएमटी बस चालक सोमेश्वर काशिनाथ शिंदे (वय-23 रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मुळ रा. मु.पो. मिरवट, ता परळी जि. बीड) याच्यावर आयपीसी 304(अ), 279 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
फिर्यादी यांचे भाऊ बद्रुद्दिन अन्सारी हे दुचाकीवरून एमआयडीसी चौकातून लांडेवाडीकडे जात होते. कामगार नेते रुपमय चटर्जी पुतळ्याजवळ आरोपीने पीएमटी बस वेगात चालवून फिर्यादी यांच्या भावाच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अन्सारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक इंगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा इशारा; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Amit Shah : शिवसेना-राष्ट्रवादी कुणामुळे फुटली? अमित शाह यांनी दिले स्पष्टीकरण

Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या कर्णधाराची घोषणा, ‘हा’ खेळाडू सांभाळणार टीमची कमान

Bhushan Gagrani : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आय़ुक्तपदी भूषण गगरानी यांची नियुक्ती

Rakhi Sawant : राखी सावंतच्या अडचणीमध्ये वाढ ! समीर वानखेडेंनी दाखल केला मानहानीचा गुन्हा

Lok Sabha Election 2024 : अजितदादा आणि धनंजय मुंडेंना मोठा धक्का! ‘या’ जवळच्या व्यक्तीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडली साथ

Lok Sabha Election 2024 : अखेर ! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला

Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश

Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?

Nitin Gadkari : “… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण

Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Halasana : हलासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!