मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आय़ुक्तपदी भूषण गगरानी (Bhushan Gagrani) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत असणारे अधिकारी जे 3 वर्षांपासून ज्या पदावर आहेत त्यांच्या बदल्या केल्या गेल्या. इकबाल सिंह चहल यांच्या बदलीनंतर बीएमसी आय़ुक्त कोण होणार याची चर्चा सुरू होती.
राज्याच्या मुख्य सचिवांनी तीन अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाला सुचवली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने भूषण गगरानी यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय नवी मुंबईच्या आय़ुक्तपदी कैलाश शिंदे यांची नियुक्ती केल्याचे आदेश निवडणूक आयोगाने जारी केलेे आहेत.
सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करत तीन नावे निवडणूक आय़ोगाला पाठवली होती. त्यातील भूषण गगरानी यांची नियुक्ती करण्यात आली. गगरानी हे 1990 च्या बॅचचे आहेत. गगरानी हे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव होते. भूषण गगरानी आजच पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Rakhi Sawant : राखी सावंतच्या अडचणीमध्ये वाढ ! समीर वानखेडेंनी दाखल केला मानहानीचा गुन्हा
Lok Sabha Election 2024 : अखेर ! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला
Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश
Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?
Nitin Gadkari : “… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण
Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या