Nitesh Karale Guruji

Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?

700 0

पुणे : स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून मार्गदर्शन करणारे नितेश कराळे गुरुजी (Nitesh Karale Guruji) आता एका नव्या वाटेवर चालण्यासाठी सज्ज झाले आहेत. विद्यार्थ्यांचे लाडके कराळे गुरुजी आता राजकारणात येण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या लोकसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या रणांगणात उरतण्याची तयारी कराळे गुरुजींची आहे. यासंदर्भात त्यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर नितेश कराळे गुरुजी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काय म्हणाले नितेश कराळे गुरुजी?
मी मागे काहीवेळा शरद पवारसाहेबांच्या भेटी घेतल्या. पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर मी वर्धा मध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवेल. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे. प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो, हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो आहे. महाविकास आघाडी मधल्या कुठल्या ही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो. पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक आहेत, असं कराळे गुरुजी म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nitin Gadkari : “… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण

Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Halasana : हलासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!