Hemangi Kavi

Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

1175 0

मुंबई : न्याय्य हक्क, समान अधिकारासाठी महिला चळवळींनी केलेल्या संघर्षाची आठवण म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. परितोष त्रिपाठी यांची कविता तिने शेअर करत या कवितेने माझ्या डोळ्यात पाणी आले असल्याचे हेमांगीने सांगितले.

हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?
हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, काल चित्रीकरणादरम्यान तू कविता सादर केली आणि माझे डोळे भरून आले. गेल्या काही दिवसांपासून मला मोठ्याने सांगायचे आणि ओरडायचे होते ते प्रत्येक शब्द आणि भावना त्यात असल्याचे हेमांगीने म्हटले. काही लोकांसाठी, कोणत्याही क्षेत्रातील महिलांचे यश महत्त्वाचे समजत नाहीत. अशी लोक फक्त महिलांनी कोणते कपडे परिधान केले, कसा ड्रेस आहे, अशी चर्चा करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आणि सभ्यतेच्या नावाखाली ते आम्हाला पुन्हा गुलाम आणि दुबळे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही हेमांगीने म्हटले.एका बाजूला अशी लोक असताना दुसरीकडे तुमच्यासारखी काही माणसे आपला दृष्टीकोण, विचार योग्य ठेवत महिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्यांच्या पाठिशी उभे राहतात आणि प्रोत्साहन देतात. त्यामुळे आम्ही कोण आहोत, हे आम्हाला कळते असेही हेमांगीने म्हटले.

हेमांगी कवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ (Madness Machaenge India Ko Hasaenge) या कार्यक्रमात हेमांगी कवी ही अभिनेता कुशल बद्रिकेसह सहभागी होणार आहे. या शो मध्ये परितोष त्रिपाठी, स्नेहिल दीक्षित मेहरा (बीसी आंटी), गौरव दुबे, केतन सिंह, अंकिता श्रीवास्तव, इंदर साहनी हे कलाकारदेखील सहभागी होणार आहेत. 9 मार्चपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Suicide News : महिला डॉक्टरने महिला दिनादिवशीच इंजेक्शन टोचून संपवले स्वतःचे आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर

Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News
error: Content is protected !!