Pune News

Pune News : कात्रज उद्यानालयाच्या अनाथालयातून बिबट्या पळाला; मात्र…

1054 0

पुणे : कात्रज उद्यानांमधील अनाथालयात असणारा बिबट्या अनाथालयातून बाहेर पळाल्याची घटना कात्रज उद्यानामध्ये सोमवारी घडली. हि बातमी सोशल मीडियावर वारसारखी पसरली. या संदर्भात कात्रज उद्यान अधीक्षक राजकुमार जाधव यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी कात्रज उद्यानालयाच्या अनाथालयातून बिबट्या पळाला हि बातमी खरी असल्याचे सांगितले मात्र हा बिबट्या उद्यानालयाच्या बाहेर पळाला नसून उद्यानालयाच्या परिसरात पळाला आहे. तो उद्यानातच असून रेस्क्यू टीमकडून त्याला परत त्याच्या पिंजऱ्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उद्या सकाळपर्यंत यश आलं नाही तर उद्या बाग बंद ठेवली जाईल. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना घडून देखील उद्यान प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांसाठी बाग बंद करण्यात आलेली नव्हती किंवा तशा सूचनादेखील देण्यात आलेल्या नव्हत्या. प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी का घेण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

या बाबत मिळालेली अधिकृत माहिती अशी की सदर बिबट्या हा एक महिन्यापूर्वी हंपी या ठिकाणाहून पुण्यात आला होता त्यानंतर त्याला विलीनीकरण केंद्रात ठेवलं होतं रविवारी रात्री कात्रज येथील प्राणी संग्रहालयात जयपूर वरून 3 तरस आले रात्री दीड वाजेपर्यंत हे तरस आल्यानंतर काम सुरू यावेळी सुरू असलेल्या लाईट आणि गोंगाट यामुळे बिबट्या व्यथित झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या हा बिबट्या प्राणीसंग्रालयात असून प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. कोणत्याही क्षणी बिबट्याला रेस्कु केलं जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय

Share This News
error: Content is protected !!