मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी एका नेत्याने काँग्रेसचा हात सोडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येत्या 2 दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
