Pune News

Pune News : पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी – शिवाजी मानकर

307 0

पुणे : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे (Pune News) आहेत. वाहतुकीची समस्या, सुरळीत पाणीपुरवठा, मेट्रोचा विस्तार, पार्किंग व्यवस्था, औद्योगिक सामाजिक बांधीलकी (सीएसआर) निधीतून शाळांचे सक्षमीकरण, स्वच्छता मोहीम, कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींवर लोकसहभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी पुणे लोकसभा मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून काम करणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी व्यक्त केली.

सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मानकर यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले. ‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सशक्त भारत साकारण्यासाठी शहरातील सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, असेही ते म्हणाले. प्रसंगी अ‍ॅड. मंदार जोशी, अमित जाधव, अ‍ॅड. एन. डी. साबळे, अभिजित देशपांडे आदी उपस्थित होते.

शिवाजी माधवराव मानकर म्हणाले, “माझा जन्म नारायण पेठेतला असून, बालपण व माझी कारकीर्द पुण्यात बहरली आहे. पुणे शहराच्या समस्यांची मला जाण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देश-विदेशात फिरत असताना शहराचा सर्वांगीण विकास कसा असायला हवा, याची अनेक आदर्श उदाहरणे पाहिली आहेत. विकासाची ही आदर्श मॉडेल्स आपण पुण्यातही राबवू शकतो. त्याचे सर्व नियोजन आपण करत आहोत. येणाऱ्या काळात पुण्यासाठी चांगले प्रकल्प, उद्योग आणण्यासाठी, तसेच इथे असलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लोकसभेत जाण्याची संधी मिळणे गरजेचे आहे.”

“भाजपसोबत अनेक वर्षांपासून काम करत आहे. तसेच 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने व देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला ऐनवेळी येवला मतदारसंघातून विधानसभा लढण्याची संधी दिली. कोणतीही पूर्वतयारी नसताना येवल्यात तेव्हा मंत्री छगन भुजबळ यांना तुल्यबळ लढत दिली होती. माझ्यातील लढवय्या नेतृत्व व मला मिळणारा सर्वपक्षीय पाठिंबा यामुळे सर्वच सहा मतदारसंघात आम्हाला मताधिक्य मिळू शकेल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आपल्याला पुण्याच्या लोकसभेची उमेदवारी देऊन पुणेकरांच्या सेवेची संधी देईल, असा विश्वास वाटतो,” असे मानकर यांनी नमूद केले.

“पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यावर, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासह मेट्रोचा विस्तार, रिंग रोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न, स्वच्छ शहर व महापालिकेच्या शाळांचे सक्षमीकरण, पुण्याचा आत्मा असलेल्या मुळा-मुठा नदीचे संवर्धन, केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून महिला, तरुण यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासह इतर अनेक योजनांवर आपण करत आहोत. पुण्यात औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्याकडे हजारो कोटींचा सीएसआर निधी उपलब्ध असतो. हा सीएसआर निधी, लोकांचा सहभाग यातून अनेक प्रकल्प व उपक्रम मार्गी लावण्यावर आपला भर असणार आहे,” असे मानकर म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vajrasana : वज्रासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

Fraud News : US मधील भारतीय महिला अडकली प्रेमाच्या जाळ्यात; तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा बसला फटका

Shilpa Bodkhe : शिल्पा बोडखेंचा शिंदे गटात प्रवेश

Pankaj Udhas Pass Away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Girl Rape : धक्कादायक ! बहिणीच्या मित्राकडून घरात घुसून तरुणीवर अत्याचार

Ind Vs Eng : टीम इंडियाचा ‘ध्रुव’ तारा चमकला; अटीतटीच्या लढतीमध्ये टीम इंडियाचा थरारक मालिका विजय

Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Related Post

केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते मल्टीलेवल पार्किंगचे उद्घाटन : खासदार गिरीश बापट

Posted by - November 23, 2022 0
पुणे : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांच्या हस्ते पुणे विमानतळावरील मल्टीलेवल पार्किंगचे दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी…

VIDEO : अजित पवारांची नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट ; गणरायाचं घेतलं दर्शन…

Posted by - September 8, 2022 0
डोणजे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्याच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणरायाचं दर्शन…
Pimpari Chinchwad Crime

Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Posted by - December 14, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad Crime) पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये वंशाचा दिवा म्हणजे…
Pune News

Pune News : पीआयबीएमचा 14 वा दीक्षांत समारंभ पुणे येथे संपन्न

Posted by - March 4, 2024 0
पुणे : “आजच्या पिढीला 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनविण्याच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळेल. आजच्या तरुण पिढीने कल्पक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *