पुण्यात मनसेच्या आणखी चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

557 0

पुणे – मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर आता पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा दिला आहे. अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिल्याचं कळतंय. मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही वसंत मोरे यांना पाठवण्यात आलंय. त्यामुळे वसंत मोरे ‘मातोश्री’वर जाणार का, वसंत मोरे शिवबंधन बांधणार का ?, हे पाहणं महत्वाचं ठरेल. एकूणच, मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरु झाल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष यांच्या राजीनाम्यामुळे मनसेसमोर आणखी एक संकट उभं राहिलंय.

Share This News
error: Content is protected !!