मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्राच्या माध्यमातून राजीनामा सोपवला आहे.
माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र…
माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत… pic.twitter.com/OZJUyFbKwa
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) February 22, 2024
शिल्पा बोडखे यांनी पत्रात काय म्हंटले
“माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र…माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली, याचे दु:ख आहे. पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल दोघींचेदेखील अभिनंदन. पुढेदेखील शिवसेना भवनात बसून असेच कार्य करत राहा. आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असेलच पुन्हा नागपुरात येऊन सावजीवर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा”, असं शिल्पा बोडखे यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटलं आहे.
शिल्पा बोडखे यांनी राजीनामा देताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला काहीच किंमत न देता विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे चर्चांना उधाण आलं असून, यावर आता ठाकरे गटातील नेते काही प्रतिक्रिया देतात का ? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Karuna Munde : परळीमधून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढविणार; करुणा शर्मा-मुंडेंची मोठी घोषणा
IPL 2024 : आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार पहिला सामना
Mumbai News : आझाद मैदान येथे आजपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे भव्य धरणे आंदोलन
Pankaja Munde : ‘तोपर्यंत फेटा बांधणार नाही’; जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी केला निर्धार
Viral Video : चालकाला हार्ट अटॅक आल्याने बोलेरोने 8 जणांना चिरडलं
Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात दाखल
WPL 2024 : उद्यापासून रंगणार महिला प्रिमीयर लीगचा थरार
Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर
PM Kisan : PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात
Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या
Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण
Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद
Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप