Hemant Godse Car Accident

Hemant Godse Car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात

937 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी (Hemant Godse Car Accident) समोर आली आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा नवी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला आहे. नवी दिल्लीतील बी डी मार्गावर अपघात झाला आहे. या अपघातमध्ये हेमंत गोडसे थोडक्यात बचावले असून सुदैवाने या अपघातात हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झाली नाही.

मात्र या अपघातात हेमंत गोडसे यांच्या गाडीचे मात्र मोठे नुकसान झालं आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. गोडसे यांच्याशिवाय त्यांच्यासोबत असणारे सहकारीही सुरक्षित आहेत. हेमंत गोडसे दिल्लीत येत होते. बी डी मार्गावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. ते इनोव्हा MH 15 FC 9909 या गाडीने प्रवास करत होते. त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका डीएल 7CW 2202 या गाडीने जोरदार धडक दिली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : शिवनेरीच्या पायथ्याजवळ लावण्यात आलेले पीएम मोदी, सीएम शिंदेंचे पोस्टर फाडले; 5 जणांना अटक

Shivaji Maharaj Jayanti : शिवजयंती वर्षातून 2 वेळा का साजरी होते?

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी 

Share This News
error: Content is protected !!