Rajkumar Santoshi

Rajkumar Santoshi : चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांना चेक बाऊन्स प्रकरणी जामीन मंजूर

775 0

मुंबई : चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांना चेक बाऊन्स प्रकरणी जमीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे राजकुमार संतोषी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजकुमार संतोषी यांना जामनगर कोर्टानं एका प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. याशिवाय दोन कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेशही दिले होते. त्यांना ही शिक्षा का सुनावण्यात आली होती? ते नेमके प्रकरण काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया…

काय आहे नेमके प्रकरण?
राजकुमार संतोषी यांनी जामनगरचे व्यापारी अशोक लाल यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले आणि ते परत न केल्यानं या प्रकरणाला सुरूवात झाली. या प्रकरणी न्यायालयाने अखेर आपला निकाल सुनावला आहे.एकेकाळी राजकुमार संतोषी आणि अशोक लाल हे खूप जवळचे मित्र होते. हे प्रकरण 2015 मध्ये सुरू झाले. 2019 मध्ये राजकुमार जामनगर कोर्टात सुनावणीसाठी हजर झाले होते. पैसे परत करण्यासाठी राजकुमार संतोषी यांनी प्रत्येकी 10 लाख रुपयांचे 10 चेक दिले होते, जे बाऊन्स झाले होते. त्यानंतरच दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बऱ्याच काळापासून जामनगर कोर्टात हे प्रकरण सुरु होते. गुन्हा दाखल करण्यापूर्वी या व्यावसायिकाने दिग्दर्शकाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तसं झालं नाही. या खटल्याच्या सुनावणीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. यानंतर न्यायालयाने निकाल देताना त्यांना दुप्पट रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.

राजकुमार संतोषी यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर गेल्या काही काळापासून ते त्यांच्या आगामी ‘लाहोर 1947’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.या चित्रपटात ते सनी देओलसोबत काम करत असून आमिर खानने त्याची निर्मिती केली आहे. त्यांनी आतापर्यंत शाहिद कपूर, कतरिना कैफ, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. 1990 मध्ये ‘घायल’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IND Vs ENG : टीम इंडियाने राजकोटमध्ये रचला इतिहास ! कसोटी क्रिकेटमध्ये मिळवला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

Pune News : शिक्षण हक्क कायद्यातील बदल मागे घ्या; आम आदमी पार्टीची मागणी

Ritesh Deshmukh : काका पुतण्याचं नातं कसं असावं? रितेश देशमुखांनी दिलं उदाहरण

Onion Export Ban : मोठी बातमी! केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली

Concentration : एकाग्रता कमी पडतीय तर करा ‘हा’ व्यायाम; झटपट दिसेल बदल

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मिनीबसचा भीषण अपघात

Manoj Jarange Patil : 20 फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरेची अंमलबजावणी न झाल्यास…; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!