Ritesh Deshmukh

Ritesh Deshmukh : काका पुतण्याचं नातं कसं असावं? रितेश देशमुखांनी दिलं उदाहरण

832 0

लातूर : लातूरमधील निवळी या ठिकाणी विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब (Ritesh Deshmukh) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमादरम्यान बोलताना अभिनेते रितेश देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना काका पुतण्याचं नातं कसं असावं याचंही उदाहरण त्यांनी दिलं. यावेळी बोलताना ते भावुकदेखील झाले.

आमच्यावर आजोबांचे संस्कार : रितेश देशमुख
रितेश देशमुख म्हणाले, की माझे वडील मुख्यमंत्री झाले तरीही आमचे आजोबा काही चुकलं तरी सांगत होते. एकदा लातूरला असताना साहेब आजोबांची चौकशी करण्यासाठी घरी आले होते. तेव्हा आजोबांनी एक पेपरमधील बातमी साहेबांना वाचायला दिली. त्यात एक वाक्य वैयक्तीक टीका होती. हे होता कामा नये, असं आजोबांनी त्यांना सांगितलं. राजकारणात तुम्ही टीका करा. पण, ती वैयक्तिक असू नका. विरोध करा. पण, कुठल्याही व्यक्तिवर वैयक्तीक टीका करू नये. साहेबांची खूप भाषणे गाजली. पण, त्यांनी कधीही कुणावर वैयक्तिक टीका करू नये. हाच वारसा आम्हाला वडिलांकडून मिळाला आहे. हेच संस्कार आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे असे रितेश देशमुख म्हणाले.

काका पुतण्याचं नातं कसं असावं
रितेश देशमुख म्हणाले, काका (दिलीपराव देशमुख) मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे, याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर आहे. साहेबांनी आम्हाला नेहमी स्वतंत्र दिलं. त्यांनी फक्त आम्हाला एकच गोष्ट सांगितली होती की तुम्ही शिक्षण घ्या. आम्ही तिघेही भाऊ उच्चशिक्षित झालो आहोत. मुलांवर कधीही दबाव टाकू नये. मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू द्यावे, आपण फक्त त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, अशीच शिकवण आम्हाला साहेबांनी दिल्याचं रितेश देशमुख यांनी सांगितलं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Onion Export Ban : मोठी बातमी! केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली

Concentration : एकाग्रता कमी पडतीय तर करा ‘हा’ व्यायाम; झटपट दिसेल बदल

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मिनीबसचा भीषण अपघात

Manoj Jarange Patil : 20 फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरेची अंमलबजावणी न झाल्यास…; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!