पुणे : पुण्यातून (Pune Crime) एका मैत्रीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रांनीच एका तरुणीचा घात केला आहे. वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून 15 वर्षीय मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर तिच्याच मित्रांनी बलात्कार केला आहे. पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे.
काय घडले नेमके?
अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग व गणेश यांनी मुलीला फिरायला नेतो असे सांगून फिर्यादी यांच्या सोबत गाडीवर बसून मांजरी नदीपात्राच्या झाडीत नेलं. तिथे असलेल्या एकांताचा फायदा घेऊन अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे यांनी मुलीवर आळीपाळीने जबरदस्तीचे शारीरिक संबंध केले आणि त्यानंतर मुलीला त्या निर्जनस्थळी सोडून निघून गेले. मानसिक धक्का बसलेल्या अवस्थेत पीडितेला तिच्या मैत्रिणीने घरी नेलं.
या घडलेल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने घरच्या मंडळींना सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर पीडित मुलीने आमच्याकडे तक्रार देताच, दोन्ही आरोपींना अटक केली असून आरोपी अनुराग साळवी आणि गणेश म्हेत्रे यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Anil Babar : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन
Prakash Ambedkar : ‘एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत यावं’, प्रकाश आंबेडकरांनी दिली ऑफर पण ठेवली ‘ही’ अट
Maratha Reservation : राज्यात आतापर्यंत आढळल्या 57 लाख कुणबी नोंदी
Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर..; मनोज जरांगे यांनी दिला इशारा
Imran Khan Jail : इम्रान खान यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी 10 वर्षांची झाली जेल
Solapur Crime : सोलापूर हादरलं ! ‘या’ एका शुल्लक कारणामुळे बापाने संतापाच्या भरात मुलाचा घेतला जीव