Breaking News
Maratha Reservation

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

618 0

पुणे : मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला आहे. पुण्यात यात्रा पोहोचल्यापासून पदयात्रेला मिळालेल्या प्रतिसादाने वाहतुकीवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे हा मार्ग बदलण्यात आला आहे.

कसा असेल नवीन मार्ग
मराठा आरक्षण रॅली हि नगर रोडने गुंजन चौक, पर्णफुटी चौक, तारकेश्वर चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी मार्गे संचेती चौक, शिमला ऑफिस चौक, सूर्यमुखी दत्त मंदिर चौक, विद्यापीठ चौक, औंध रोडने सरळ राजीव गांधी पूल मार्गे मार्गक्रमण करणार आहे.

आरक्षण मोर्चाचा जुना मार्ग
वाघोली- चोखीदाणी ते खराडी जकात नाका, नगर रस्त्याने खराडी बायपास, चंदननगर, विमाननगर, वडगाव शेरी हयात हॉटेल, येरवडा, शास्त्रीनगर, पर्णकुटी गुंजन चौक, बंडगार्डनमार्गे शिवाजीनगर, संचेती चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे, सांगवी फाटा, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, 16 नंबर, डांगे चौक चिंचवड, जकात नाका /चिंचवडे लॉन्स, चाफेकर चौक चिंचवड गाव, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी,भक्ती शक्ती शिल्प, देहूरोड, तळेगाव मार्गे लोणावळा असा मार्ग होता.

Share This News
error: Content is protected !!