सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आता ‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’ ; पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आणि विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम

502 20

नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता एक नवीन व्यासपीठ घेऊन आले आहे. ‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’ वर कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्या अनेक कंपन्यांना पाठविण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्या एकत्रित प्रयत्नातून स्टिक या उपक्रमांतर्गत ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक कौशल्ये या माध्यमातून देण्यात येतील तसेच या व्यासपीठाच्या माध्यमातून वैश्विक स्तरावर संधीही निर्माण होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, इनोव्हेशन सेलच्या प्रमुख डॉ. अपूर्वा पालकर, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य संतोष ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि प्लेसमेंट ऑफिसर उपस्थित होते.

डॉ. पालकर म्हणाल्या, ३०० पेक्षा जास्त कंपन्या जोडलेल्या असलेल्या या व्यासपीठावर पिंपरी चिंचवड मधील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा विनाशुल्क वापर करता येईल. तसेच लवकरच डिग्री प्लस व्यासपीठावर सुद्धा हा उपक्रम नाममात्र शुल्कात सुरू करण्यात येईल असेही डॉ. पालकर यांनी सांगितले.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!