सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आता ‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’ ; पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आणि विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम

360 0

नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता एक नवीन व्यासपीठ घेऊन आले आहे. ‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’ वर कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्या अनेक कंपन्यांना पाठविण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्या एकत्रित प्रयत्नातून स्टिक या उपक्रमांतर्गत ही संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक कौशल्ये या माध्यमातून देण्यात येतील तसेच या व्यासपीठाच्या माध्यमातून वैश्विक स्तरावर संधीही निर्माण होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, इनोव्हेशन सेलच्या प्रमुख डॉ. अपूर्वा पालकर, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य संतोष ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि प्लेसमेंट ऑफिसर उपस्थित होते.

डॉ. पालकर म्हणाल्या, ३०० पेक्षा जास्त कंपन्या जोडलेल्या असलेल्या या व्यासपीठावर पिंपरी चिंचवड मधील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा विनाशुल्क वापर करता येईल. तसेच लवकरच डिग्री प्लस व्यासपीठावर सुद्धा हा उपक्रम नाममात्र शुल्कात सुरू करण्यात येईल असेही डॉ. पालकर यांनी सांगितले.

Share This News

Related Post

Johnny Wactor

Johnny Wactor : खळबळजनक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या

Posted by - May 27, 2024 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण अजूनही संपलेलं नाही. सलमान खान गोळीबार प्रकरण ताज असताना एक धक्कादायक…
Movie Released In 2023

Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला

Posted by - December 31, 2023 0
2023 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी खूप भारी गेलं. या वर्षी अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. यामधील काही चित्रपट वादाच्या भोवऱ्यातदेखील…

प्रभाग रचनेवर तब्बल साडेतीन हजार हरकती सूचना

Posted by - February 16, 2022 0
पुणे- पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर अनेकांनी या प्रभाग आराखड्यावर नाराजी व्यक्त केली होती. शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ३…

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी येथे दाखल

Posted by - April 13, 2022 0
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *