Pune News

Pune News : रायसोनी कॉलेज, पुणेच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप “कृषी आधार” ला अमेथॉन ज्ञान इनोव्हेशन चॅलेंजमध्ये पुरस्कार

390 0

पुणे : जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी प्रवीण शेळके, प्रसाद धेंड आणि आर्या महाडिक यांचा समावेश असलेल्या ‘युरेका एन्वॉयज’ या विद्यार्थ्यांच्या संघाने आयआयएम -अहमदाबाद येथे आयोजित अमेथॉन ज्ञान इनोव्हेशन चॅलेंजमध्ये “कृषी आधार” स्टार्टअप ने उपविजेतेपद 15,000 रुपयाचे पारितोषिक जिंकले.

विद्यार्थी संघ ‘युरेका एन्वॉयज’, नाविन्यपूर्ण स्टार्टअप, “कृषी आधार,” या प्रतिष्ठित स्पर्धेत लक्ष वेधून घेतले. ही स्पर्धा अमेथॉन ज्ञान इनोव्हेशन चॅलेंजचा एक भाग होती. यामध्ये देशभरातील असंख्य इच्छुक उद्योजक आणि स्टार्टअप्सचा सहभाग होता. प्रा.स्वप्नील महाजन यांनी स्टार्टअपसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.हनी बी नेटवर्कचे संस्थापक पद्मश्री अनिल कुमार गुप्ता यांच्याकडून रायसोनीच्या विद्यार्थी संघाला अतिरिक्त समर्थन करत इनक्युबेशन स्पार्टअप हे कृषी क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले.

रायसोनी पुणे कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर, म्हणाले की, जीएच रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण आणि उद्योजकीय कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील असते. अमेथॉन ज्ञान इनोव्हेशन चॅलेंजमधील ‘युरेका एन्वॉयज’चे यश नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्टतेची पावती आहे. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष श्री सुनील रायसोनी आणि रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी यांनी “कृषी आधार” या नाविन्यपूर्ण स्टार्टअपमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Navi Mumbai : मोबाईल वर बोलला आणि जिवानिशी मुकला! काय घडले नेमके?

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!