Virat Kohli

Virat Kohli : विराट कोहलीला ‘तो’ विश्वविक्रम करण्यासाठी फक्त 6 धावांची गरज

951 0

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी20 सामना (Virat Kohli) आज बंगळुरुमध्ये खेळवला जाणार आहे. या अगोदरचे 2 सामने जिंकून टीम इंडियाने आधीच मालिका आपल्या खिशात घातली आहे. आजचा सामना जिंकून टीम इंडिया शेवट गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. याचबरोबर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे ते विराट कोहलीच्या कामगिरीवर.अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 सामन्यात विराट कोहलीला विश्वविक्रम रचण्याची संधी आहे. या सामन्यात विराट कोहलीने 6 धावा केल्यास टी20 क्रिकेट प्रकारात 12 हजार धावांचा टप्पा पार करणार आहे. सध्या टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावाा करण्याचा विक्रम वेस्टइंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे.

विराट कोहलीला विक्रमाची संधी
टी20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 375 सामने खेळले आहेत. यात विराटच्या नावावर तब्बल 11994 जमा आहेत. 375 सामन्यात विराटने 8 शतकं आणि 91 अर्धशतकं झळकावली आहेत. 6 धावा केल्यास विराट कोहली 12 हजार धावांचा टप्पा पार करणार आहे. याशिवाय टी20 क्रिकेटमध्ये वेगवान 12 हजार धावा बनवण्याच्या विक्रमही त्याच्या नावावर होणार आहे.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने 463 सामन्यात तब्बल 14562 धावा केल्या आहेत. यात त्याने 22 शतकं आणि 88 अर्धशतकं झळकावली आहेत. ख्रिस गेलची सर्वोत्तम धावसंख्या 175 आहे. पाकिस्तानचा शोएब मलिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. शोएब मलिकने 525 धावात 12993 धावा केल्या आहेत. यात त्याने 82 अर्धशतकं झळकावलीत. पण टी20 क्रिकेटमध्ये शोएबला एकही शतक झळकावता आलेलं नाही. तसेच वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज कायरन पोलार्ड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Navi Mumbai : मोबाईल वर बोलला आणि जिवानिशी मुकला! काय घडले नेमके?

Bhandara Video : आऊट ऑफ कंट्रोल झालेल्या बैलगाड्याने थेट आजोबांना उडवले; व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू

Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!