मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या ट्विटरवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मुख्यमंत्री शिंदेच्या कार चालकाने शूट केला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालकाच्या बाजूच्या सीटवर येऊन बसतात. बसण्या तिथे दारजळ उभे राहून समर्थकांना हात दाखवतात आणि स्थानापन्न होतात. दरम्यान शिंदे गाडीमध्ये बसण्याआधीच बॅक सीटवर मध्यभागी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसलेले दिसत आहेत. कार मध्ये आल्यानंतर मागील बाजूच्या सीटवर बावनकुळे यांच्या उजवीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेच्या मागील रांगेतील विंडो सीट पकडतात. तर बावनकुळे यांच्या डावीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार कार मध्ये शिरतात.
जर केली नसती सुरत गुवाहाटी
तर कशाला झाली असती दाटीवाटी..!!!!#goodmorning pic.twitter.com/MFkKanbiFm— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) January 17, 2024
अजित पवार बावनकुळे फोर्थ सीट
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कालच्या मागील सीटवर पूर्ण क्षमतेने म्हणजेच तीन सीटवर तीन नेते झाल्यानंतर ही चालकाच्या मागील दारातून भाजपाचे आमदार गिरीश महाजन देखील कारमध्ये शिरतात. महाजन कार मध्ये शिरल्याने अजित पवार अजून उजवीकडे सरकतात दरम्यान बावनकुळे महाजनांना जागा करून देण्यासाठी पुढे सरकून बसतात. त्यामुळे एका बाजूने फडणवीस दुसरीकडून महाजन अशा स्थितीत मध्यभागी बावनकुळे अजित पवार फोर्थ सीटवर बसल्याप्रमाणे अगदी दाटीवाटीने बसलेले दिसत आहे.
सुषमा अंधारे यांनी लगावला टोला
सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ शेअर करताना सत्ताधाऱ्यांना टोला लागला आहे. जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी असे कॅप्शन दिले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन
Mumbai Highcourt : तुला जेवण बनवता येत नाही असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; हायकोर्टाने दिला निर्णय
Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश
Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू
Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह ‘या’ व्यक्तीला सुनावली पोलीस कोठडी
Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू
Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल