रणबीर आलिया लवकरच लग्न बंधनात, लग्नाचा मुहूर्त ठरला!

552 0

बॉलीवूड कलाकार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या विवाहाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, या जोडप्याने आपल्या कथित विवाहासंबंधी अद्याप अधिकृतपणे काहीच माहिती दिलेली नाही. मात्र एप्रिल महिन्यातच दोघेजण विवाहबद्ध होत असून काही दिवसांतच या दोघांचा लग्नसोहळा रंगणार आहे.

या दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग न करता मुंबईत लग्न करण्याचं ठरवलं आहे. ज्या ठिकाणी दिवंगत ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा विवाहसोहळा झाला. त्याच आरके स्टुडिओमध्ये रणबीर आणि आलिया विवाहबद्ध होणार आहेत अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे. या विवाहात सुमारे 450 पाहुणे सहभागी होणार आहेत. मात्र, अद्याप विवाहाची तारीख निश्चित केली नसल्याचे समजते.

विवाह सोहळ्यामध्ये ज्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे त्यांना एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात वेळ काढण्यास सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या तारखेचा खुलासा अद्याप झालेला नाही. कपूर कुटुंबाला एप्रिलच्या अखेरीस लग्न करायचं होतं. परंतु आलियाचे आजोबा नरेंद्र नाथ राजदान यांची प्रकृती ठीक नसल्यानं भट कुटुंबानं हे लग्न लवकर करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या ५ वर्षांपासून रणबीर कपूरला डेट करत आहे. आपल्या सिनेमाप्रमाणेच आपल्या पर्सनल लाईफमुळे आलीया खूप चर्चेत असते.

Share This News
error: Content is protected !!