milind deora

Milind Deora : काँग्रेसला मोठा धक्का ! माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम

466 0

मुंबई : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या राजीनाम्याबद्दल माहिती दिली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँगेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मिलिंद देवरा यांनी काय लिहिले ट्विटमध्ये?
’ मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. यासोबतच माझे माझ्या कुटुंबाचे गेल्या 55 वर्षांपासून काँग्रेससोबत नाते होते. या नात्याला देखील पूर्णविराम मिळाला आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी मला सतत पाठिंबा दिला’ असं ट्विट देवरा यांनी केलं आहे.

दरम्यान मिलिंद देवरा हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत दहा माजी नगरसेवक, वीस महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह 450 कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं

Pandharpur News : हृदयद्रावक ! दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद

Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग

Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग

Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु

IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!