Maratha Reservation

Maratha Reservation : धक्कादायक ! मराठा आरक्षणापायी मराठवाड्यात दोघांनी संपवलं जीवन

545 0

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील काही दिवसांत मराठवाड्यात आत्महत्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. आत्महत्या करू नका असे अवाहन मनोज जरांगे यांच्याकडून सतत करण्यात येत आहे. मात्र, असे असतांना देखील तरुण टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा मराठवाड्यात दोघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.

परभणी जिल्ह्यातील 34 वर्षीय आणि लातूरमधील 21 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं आहे. सचिन शिंदे (वय 34 वर्ष, सनपुरी लातूर), प्रदीप निवृत्ती मते (वय 21 वर्ष, रा.लोणी शहाजहानपूर, ता. जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणांची नावं आहेत. परभणीच्या सनपुरी गावात 34 वर्षीय सचिन शिंदे याने मराठा आरक्षणासाठी आपले जीवन संपवले आहे.

‘मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी स्वतःला संपवत आहे’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून सचिनने शेतात गळफास घेत आत्महत्या केली. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लातूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेत असलेल्या प्रदीप मते या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. ‘मराठा आरक्षण’ अशी चिठ्ठी लिहून व मोबाईलवर स्टेटस ठेवत गळफास लावून या तरुणाने जीवन संपवलं. या प्रकरणी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद

Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग

Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग

Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु

IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी ‘त्या’ 3 जणांना अटक; आतापर्यंत 13 जणांना अटक

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!