Amravati News

Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी

687 0

अमरावती : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला (Amravati News) होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याला देशभरातील प्रमुख साधू संतांना निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण अमरावतीच्या रुक्मिणी विदर्भ पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना देखील देण्यात आले आहे. आता स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या पत्रामुळे संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पत्रामध्ये काय लिहिले?
आप जो अयोध्या.. अयोध्या कर रहे हो, वह आपको महंगा पडेगा. आज नही तो कल, कुछ दिनो मे आपका अंत निश्चित है.. असा आशयाचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे. मात्र हे पत्र नेमके कुणी पाठवले? याबाबत त्या पत्रात उल्लेख केलेला नाही. याप्रकरणी महाराजांच्या अनुयायांनी कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजेश्वराचार्य महाराजांना सुरक्षा द्या; अनुयायांची मागणी
या पत्रामुळे संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराजांना तात्काळ प्रशासनाकडून पोलीस संरक्षण मिळायला हवे, अशी मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना विदर्भपीठ आणि जिल्ह्यातील विविध संघटनांकडून देण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु

IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी ‘त्या’ 3 जणांना अटक; आतापर्यंत 13 जणांना अटक

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!