Pune Lonavala Local

Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु

393 0

पुणे : पुणे शहरातून लोणावळा लोकलने (Pune Lonavala Local) प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुणे उपनगरात राहणाऱ्या अनेक जणांसाठी हा प्रवास नित्याचा असतो. परंतु त्यांना गेल्या काही महिन्यांपासून ही सुविधा मिळत नव्हती. मात्र आता या प्रवाशांसाठी आता रेल्वे प्रवाशाने एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दुपारच्या वेळी बंद असलेली पुणे (शिवाजीनगर) – लोणावळा लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाकाळात दुपारच्यावेळेत पुणे-लोणावळा येथून सुरू होणारी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र कोरोनाचे सावट संपले तरीही दुपारच्या वेळीतील ही सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारी शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी येत होत्या. तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी वाट पाहावी लागली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दुपारच्या वेळेतच लोकल सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. मात्र आता या मागणीला यश मिळाले असून पुणे रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यान लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकलची वेळ काय असणार?
शिवाजीनगर येथून दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी ही लोकल सुटेल आणि 12 वाजून 45 मिनिटांनी लोणावळा येथे पोहचेल. तर रात्री 11.30 ला लोणावळ्याहून लोकल सुटेल आणि 1 वाजून 20 मिनिटांनी शिवाजीनगरला पोहोचेल. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी ‘त्या’ 3 जणांना अटक; आतापर्यंत 13 जणांना अटक

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Share This News
error: Content is protected !!