लातूर : लातूरमधून एक भीषण अपघाताची (Car Accident) घटना समोर आली आहे. लातूरमध्ये एका शेतकऱ्याला लिफ्ट मागणे जीवावर बेतले आहे. भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील लामजना पाटी जवळील पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमींना रुग्णालयात दाखल केलं.
काय घडले नेमके?
लातूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याला लिफ्ट घेणे जीवावर बेतलं आहे. शेताकडून घरी परतण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघालेल्या तरुणाचे अपघाती निधन झालं आहे. निलंगा – औसा रोडवरील लामजना पाटी जवळ हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. त्या धडकेत दुचाकी 40 ते 50 फुट लांब फरपटत गेली. या भीषण अपघातात लिफ्ट घेणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील 2 आणि दुचाकीवरील 1 जण असे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
शिवकुमार कांबळे असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शिवकुमार कांबळे हा निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील रहिवासी आहे. शिवकुमारच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लातूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Atal Setu : देशातील सर्वात लांब सागरी पुल अटल सेतूची काय आहेत वैशिष्ट्ये ?
Tata Group : मॅगीला टक्कर देण्यासाठी टाटा ‘या’ कंपनीची करणार खरेदी
Satara News : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन
Bank Holiday : मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी
Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याप्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना
Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू