मुंबई : यूपीएससी सिविल सेवा परीक्षा (IPS Simala Prasad) भारतातील सर्वाधिक कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा पास करण्यासाठी अनेक विद्यार्थी खूप मेहनत घेतात. असे काही विद्यार्थी आहेत, जे कित्येक प्रयत्नांनंतर पास होतात, पण काही मोठी मेहनत घेऊनही पास होऊ शकत नाही. पण असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्याच प्रयत्नात मोठं यश मिळतं. आज आपण एका बॉलिवूड अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात सिविल सेवा परीक्षा पास केली.
कोण आहे IPS सिमाला प्रसाद?
सिमाला प्रसाद या 2010 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या सध्या मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एसपी म्हणून तैनात आहेत. सिमाला यांचा जन्म ऑक्टोबर 1980 मध्ये भोपाळमध्ये झाला होता. त्यांनी सेंट जोसेफ को-एड स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी बी.कॉमचा अभ्यास केला आणि त्यापुढे भोपाळमधील बरकतउल्ला विद्यापिठातून त्यांनी समाजशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली. कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिमाला यांनी सर्वात आधी मध्य प्रदेश लोक सेवा आयोगची एमपीएससी परीक्षा पास केली. ही परीक्षा पास केल्यानंतर त्यांची डीएसपी पदावर नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान त्यांनी केवळ सेल्फ स्टडी करुन यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यातही मोठं यश मिळवलं.
बॉलिवूडमध्ये देखील केले काम
दिल्लीत एका कार्यक्रमात दिग्दर्शक जैगम इमाम यांची भेट सिमाला प्रसाद यांच्याशी झाली. सिमाला यांचा साधेपणा, सुंदरता तसंच त्यांची हुशारी पाहून त्यांना जैगम यांनी आपल्या ‘अलिफ’ या सिनेमाची ऑफर दिली. 2017 मध्ये आलेल्या ‘अलिफ’ सिनेमातून सिमाला यांनी बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर 2019 मध्ये आलेल्या ‘नक्कश’ या बॉलिवूड सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांनी ‘अलिफ’ सिनेमात ‘शम्मी’ आणि ‘नक्कश’ सिनेमात एका पत्रकाराची भूमिका साकारली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shivadi Nhava Sheva Sea Link : शिवडी- न्हावाशेवा सी लिंकवर ‘या’ गाड्यांना असणार बंदी
Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प
Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांनादेखील पोलिसांकडून अटक
Rohit Sharma : रोहित शर्मा रचणार इतिहास ! ‘हे’ 3 विक्रम मोडण्याची आहे संधी
Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वारांना धडक
Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?
Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता