Breaking News
Talathi Bharti

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

471 0

पुणे : 5 जानेवारी रोजी तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आता समोर आले आहे. यामुळे तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरतीत टॉपर विद्यार्थिनीला 200 पैकी 214 मार्क मिळाले आहेत.याच विद्यार्थीनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये फक्त 54 मार्क पडले होते. या दोन्ही परीक्षांमध्ये 14 दिवसाचा गॅप असताना हे कसं शक्य झालं असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून उपस्थित करण्यात आला आहे.तसेच या निकालावर आक्षेप घेण्यात आला आहे. या भरती परीक्षेत घोटाळा झाला असून, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी या समितीकडून करण्यात येत आहे.

200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतेय हे स्पष्ट होत आहे. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. तलाठी भरती परीक्षेतल्या घोटाळ्याचे पुरावे विजय वडेट्टीवार यांनी सादर करावेत. पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली; दाखला मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

Gondia Crime : गोंदिया हादरलं ! पैशांच्या वादामुळे टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

Raj Thackeray : मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Sharad Mohol Murder : शरद मोहळच्या हत्येचं भादेगाव कनेक्शन आले समोर

Kiran Mane : हाती शिवबंधन बांधत अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश

Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी

Supriya Sule : लवकर उठून कामाला लागणे ही अजित पवारांची स्टाईल, सुप्रिया सुळेंनी केले अजित पवारांचे कौतुक

Crime News : खळबळजनक ! कॉलेजला गेली मात्र माघारी परतलीच नाही; अचानक आढळला मृतदेह

Share This News
error: Content is protected !!