सार्वजानिक ठिकाणी होणाऱ्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ (Women Fight Video) तुम्ही पाहिले असतील. कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी मेट्रोमध्ये, अनेकदा कशाचीही पर्वा न करता लोकं बिनधास्त भांडताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमधील हा व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका मेट्रोच्या बोगीमध्ये खूपच गर्दी झाली होती. त्यावेळी काही कारणास्तव दोन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. दोन्ही महिलांमधील वाद वाढत गेला अन् प्रकरण तापलं. यानंतर एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या कानाखाली मारली. त्याचवेळी जवळ उपस्थित असलेल्या महिलांनी दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.
दिल्ली मेट्रो तक इन दिनों सर्कस बनता जा रहा है। दो महिलाएं आपस में भिड़ीं और एक-दूसरे के बाल खीचें। थप्पड़ और मुक्के भी मारे गए। #DelhiMetro #ViralVideos #MetroViralVideo pic.twitter.com/MFl3RLKDNq
— Sunit Suman🇮🇳 (@sksuman538) December 31, 2023
महिलेच्या काही मैत्रिणी देखील मेट्रोमध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी देखील हात साफ करून घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र, बाकीच्या महिलांनी वाद शमवल्याचा प्रयत्न केला अन् काही वेळाने दोन्ही महिला वेगवेगळ्या स्टेशनवर उतरल्या. मात्र, ज्यावेळी भांडण सुरू होतं, तेव्हा मेट्रोमधील प्रकरण चांगलंच तापलं होतं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : अहमदनगरमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात; 3 जण ठार
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! बाईकच्या अपघातातून वाचले अन्…
Sport News : 2023 मध्ये क्रीडा विश्वात घडल्या ‘या’ महत्वाच्या घडामोडी
Movie Released In 2023 : ‘या’ 15 चित्रपटांनी 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत केला कल्ला
Veteran Artists Pass Away In 2023 : 2023 मध्ये ‘या’ दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप
Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी