सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात काही व्हिडीओ मजेशीर, असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये चक्क पाचव्या मजल्यावरुन एक जोडपे (नवरा-बायको) खाली पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
https://twitter.com/rarelastimage/status/1738848153523380627
काय आहे व्हिडिओमध्ये?
हा व्हायरल व्हिडीओ एका कॉलनीतील रस्त्यावरचा आहे. रस्त्यावरुन तीन तरुण मुले जाताना दिसतात. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अचानक रस्त्याच्या शेजारी असलेल्या इमारतीमधून खाली महिला आणि पुरुष पडतात आणि एकच थरकाप उडतो. या तीन तरुणांना हे महिला पुरुष जवळपास धडकतात. इमारतीतून कुणीतरी खाली पडलेले आहे, हे पाहून ते तरुण मुले सुद्धा घाबरतात आणि थोडे दूर होतात. पण नंतर नेमके काय घडले आणि कोण पडले हे बघण्यासाठी हे मुले जवळ येतात आणि आजुबाजूला राहणारे कॉलनीतील इतर लोकही जमा होतात.
हे जोडपे पाचव्या मजल्याच्या बाल्कनीमध्ये भांडण करत होते आणि भांडता भांडता चुकून खाली पडतात. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर या जोडप्याचा जीव वाचला की नाही, याविषयी अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर
Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात
IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश
Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल
Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द
Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल
Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या
Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं