Pune Transport

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

1539 0

पुणे : कोरेगाव भीमा जवळ पेरणे फाटा येथे (Pune Transport) 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायी एकत्र येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवाशांनी, वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

कोणकोणत्या मार्गांमध्ये होणार बदल जाणून घेऊया…
पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी, खराडी बायपास येथून उजवीकडे वळण घेवून मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळण घेवून पुर्ण सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूर मार्गे नगररोड असे जावे.

सोलापूर रोडवरुन आळंदी, चाकण याभागात जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर, मगरपट्टा चौक, उजवीकडे वळण घेवून खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जावे.

मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील.

मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगर अशी जातील.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर येथून पुणे सोलापूर हायवेने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूर मार्गे नगररोड असे जावे.

विश्रांतवाडी लोहगाव मार्गे वाघोली व वाघोली लोहगाव मार्गे विश्रांतवाडीकडे जाणारी जड वाहतूक 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Pune News : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Pune News : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!