Accident News

Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

664 0

सोलापूर : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतानाच दिसत आहे. सोलापूरमधून अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या रिक्षाला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने एका महाविद्यालयीन तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. भाग्यश्री निवृत्ती कांबळे (वय 17) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात झाला आहे.

कसा घडला अपघात?
विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या रिक्षाला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्यानंतर भाग्यश्री रिक्षातून बाहेर फेकली गेली. यानंतर सर्व्हिस रोडवर आपटल्याने भाग्यश्री गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण अपघातात भाग्यश्री बरोबर अजून दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी, आदित्य सुनील भोसले अशी अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. आपल्या तरुण पोरीचा असा अपघाती मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपी कारचालकाचा शोध घेत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 24 जानेवारीला होणार सुनावणी

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण

Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

Suryakumar Yadav : टीम इंडियाला T -20 वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का ! सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide