Supreme Court

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 24 जानेवारीला होणार सुनावणी

934 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापलेला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणा संदर्भात क्युरेटिव्ह याचिका स्वीकारण्यात आली आहे. येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येणार आहे. आज न्यायालयाने स्पष्ट केले की 12 वाजून 23 मिनिटाला याबाबत न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायाधीश यावर मराठा आरक्षण सुधारणा याचिकेवर विचार करतील.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण वैध आहे की नाही, या मुद्यावर पाचसदस्यीय घटनापीठाकडून पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लक्षात घेऊन शेवटचा प्रयत्न म्हणून सरकारने क्युरेटिव्ह याचिका सादर केली होती. अखेरीस ही याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण

Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

Suryakumar Yadav : टीम इंडियाला T -20 वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का ! सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

Attempted Self-Immolation : मॉर्डन महाविद्यालयातील दिव्यांग शिक्षकानं उच्च तंत्रशिक्षण विभागात केला आत्मदहनाचा प्रयत्न

Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide