वाढत्या महागाई विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

379 0

सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल सह  गॅस दरांच्या किमतीच्या विरोधात पुण्यात महागाई ची गुढी उभारत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील अलका चौकात हे आंदोलन करण्यात आलं

यावेळी 2014 मध्ये स्वस्ताई आणू असं म्हणत सत्तेवर आलेलं केंद्रातील भाजप सरकारला सत्तेत येताच आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असल्याची टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली.

Share This News
error: Content is protected !!