Pune Murder

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

619 0

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune Murder) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये चक्क एका मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केली आहे. बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने ही हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राजेश कांबळे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर राहुल शेषराव रिकामे आणि सय्यद जमीर उर्फ सहील बाब्या सय्यद असे हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
राहुल रिकामे याच्या बहिणीशी राजेश कांबळे या तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. या संशयावरून या दोघांनी राजेश याला बालेवाडीच्या गोल्डन टेरेस सोसायटी जवळ भेटायला बोलावले. यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेत राजेशचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी राजेशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो वाकडच्या नदीमध्ये फेकून दिला.

या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Nashik Video : हातात तलवार घेऊन गुंडाचा झेरॉक्स दुकानावर हल्ला; नाशिकमधील घटना

Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!