इंदापूर : पुण्यातील इंदापूरमधून (Indapur Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा अपघात झाला आहे. शाळेच्या सहलीच्या बसची टेम्पोला धडक बसून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. धोकादायक वळणावर हा भीषण अपघात झाला.
काय घडले नेमके?
इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. सहलीच्या बसची टेम्पोला धडक बसून हा अपघात झाला आहे. या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर, एक शिक्षक जखमी झाला आहे. शिक्षकांसह बसमध्ये विद्यार्थीही होते. अपघातात लहान विद्यार्थीही जखमी झाले आहेत. जखमींवर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज पहाटे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ हा अपघात घडला. शालेय विद्यार्थ्यांची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती. या बसची आयशर टेम्पोला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. आयशर टेम्पो पंक्चर झाल्याने एका अवघड वळणावर थांबला होता. याच अवघड वळणावर टेम्पोला सहलीच्या बसची धडक बसली आणि अपघात घडला. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर
Telangana Crime News : तेलंगणा हादरलं ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या
Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार
Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड