नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या (Loksabha News) हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला आहे. एकाचवेळी तब्बल 33 खासदारांचे निलंबन करण्यात आले. संसदेतील ही रेकॉर्ड ब्रेक कारवाई आहे. सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोप करत लोकसभेतील 31 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईनंतर सभापतींची ही कृती म्हणजे हुकूमशाही असल्याचा हल्लाबोल निलंबीत खासदारांकडून करण्यात आला आहे.
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, द्रमूकचे खासदार टी. आर. बालू आणि दयानिधी मारन, तृणमूल काँग्रेसच्या सौगता रॉय यांच्यासह अन्य खासदारांचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 30 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित हंगामासाठी निलंबित केलं आहे. तर, विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत तीन खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
यापूर्वी लोकसभेच्या 13 आणि राज्यसभेच्या एका खासदाराचं निलंबन करण्यात आलं होतं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची एकूण संख्या 47 वर पोहोचली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune PMC Water Supply News : गुरूवारी अर्ध्या पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद
Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केलेला सलीम कुत्ता नेमका आहे तरी कोण?
Pune Viral Video : वारकरी पोशाख ,पाठीवर बॅग पुण्यातील ‘त्या’ तरुणांचा वेगळाच स्वॅग; Video व्हायरल
Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा
Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार
Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये
Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल
Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू