खोपोली : खोपोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खोपोली (Viral Video) नगर परिषदेच्या बसमध्ये महिला वाहक आणि एका महिला प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुटया पैशांच्या वादातून हा राडा झाल्याचे समजत आहे. शेवटी प्रवाशांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला.
काय घडले नेमके?
खोपोली नगर परिषदेच्या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुट्या पैशांच्या वादातून प्रवासी महिला आणि महिला वाहक यांच्यामध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या महिलेनं तिकीट काढलं, मात्र वाहक महिलेकडे तिकीटाचे उर्वरित पैसे देण्यासाठी सुटे नव्हते, यावरून सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली यानंतर दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यानंतर प्रवाशांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.
खोपोलीत बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी pic.twitter.com/XmQnpHlDuW
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) December 17, 2023
या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बसमध्ये प्रवासी महिला आणि महिला वाहक यांच्यामध्ये जोरदार राडा सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. शेवटी प्रवाशांच्या मध्यस्थिनं हा वाद सोडवण्यात आला. या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप
Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू
Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार