Bhajan Lal Sharma

Bhajan Lal Sharma : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

676 0

राजस्थान : वृत्तसंस्था – भाजपने राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केले होते. भाजपने छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री जाहीर केल्यानंतर आज त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची माळ भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) यांच्या गळ्यात पडली आहे. विशेष म्हणजे भजनलाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांची निवड अनेकांसाठी भुवया उंचावणारी ठरली आहे.

कोण आहेत भजनलाल शर्मा?
भरतपूर येथील रहिवासी भजनलाल शर्मा हे दीर्घकाळापासून संस्थेत कार्यरत आहेत. प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून भाजपने त्यांना पहिल्यांदाच निवडणूक लढवायला लावली. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती. सांगानेर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भजनलाल शर्मा विजयी झाले. संघटनेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं असल्याचं बोललं जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : “अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही”, ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये अर्थखातं कसं मिळालं? अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

Pune Accident : एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात; 5 विद्यार्थी जखमी

Women’s Reservation : महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!