पुणे : पुण्यातून अपघाताची (Pune Accident) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील चांदणी चौकात भरधाव डंपरला विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये जखमी झालेले सर्व एमआयटी प्री स्कुलची मुले आहेत. हा अपघात दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला आहे.
काय घडले नेमके?
शाळा सुटल्यानंतर ही रिक्षा विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई बेंगळुरू महामार्गावरून जात होती. त्यावेळी भरधाव असलेली रिक्षा भुयारी मार्गात डंपरला जाऊन धडकली. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
जखमीपैकी 4 मुलींना एशियन हॉस्पिटलमध्ये आणि 1 जणाला चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली आहे. अपघातात जखमी झालेले सर्व केजी चे विदयार्थी आहेत. या अपघातामुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी
Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी
Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस
Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा