Amravati News

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

412 0

अमरावती : अमरावतीमधून (Amravati News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने 20 मजूर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना घडली तेव्हा त्या ट्रॅक्टरमध्ये एकूण 35 मजूर होते. जखमींपैकी 9 जण गंभीर आहेत. दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिरोली फाट्याजळ हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या मजुरांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिरोली फाट्याजळ हा भीषण अपघात झाला आहे. शेतातून मजुरांना पुन्हा दर्यापूरकडे घेऊन जात असताना ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकूण 20 जण जखमी झाले असून त्यापैकी 9 जणांची प्रकृती गंभीर आहे.

या अपघातामध्ये जखमी झालेल्या मजुरांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Jalgaon Crime : लग्नघरात शोककळा ! जुन्या वादाच्या रागातून भावी नवरदेव तरुणाची हत्या

Jalna Firing : खळबळजनक ! जालन्यात भरदिवसा गोळीबार; 1 जणाचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!