पुणे : आजकाल लोक आपल्या मौजमजेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. पुण्यातून (Pune Crime News) अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 52 वर्षीय व्यक्तीने आपल्या मौजमजेसाठी चक्क दुचाकी चोरल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन लाख 10 हजार रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त केल्या आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हेमंत बाजीराव लगड (वय-52 रा. रामनारायण बंगला, एफ.सी.रोड, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला डेक्कन परिसरातून अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून वाहन चोरांची व चोरीस गेलेल्या वाहनांची माहिती संकलीत करुन तांत्रिक तपास सुरु केला होता. यादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक पोलीस अंमलदार वाघमारे, अतुल साठे, प्रविण राजपुत यांनी आरोपी हेमंत लगड याला डेक्कन परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र परदेशी उर्फ चिकन्या (वय-25 पत्ता माहित नाही) याने आणखी दुचाकी चोरल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपी हेमंत लगड याच्याकडून 3 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त केल्या.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील,पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीप सिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड , सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक,पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, अतुल साठे, वालकोळी, प्रविण राजपुत, खुरंगे, तुकाराम म्हस्के, शरद राऊत महिला पोलीस अंमलदार रुचिका जमदाडे यांच्या पथकाकडून करण्यात आली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर
NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक
Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त
Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा
Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक
Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या