Wife Murder

Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

481 0

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून पती – पत्नीच्या नात्याला (Wife Murder) काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
परवीन अन्सारी (26) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी परवीन अन्सारी ही पतीने हल्ला केल्यानंतर तिच्या घरी गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ‘हत्येचा आरोप असलेला पती दारूच्या पैशावरून दररोज पत्नीशी भांडत होता. ‘पती मोईनुद्दीन अन्सारी दारूच्या पैशावरून भांडत असे. गुरुवारीदेखील या दोघांमध्ये दारूच्या पैशावरून वाद झाला होता. यावेळी आरोपी पतीने पत्नीला बेदम मारहाण केली आहे.

“बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालाड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वेट्रॅकशेजारी झोपडपट्टीमध्ये एका दारुचे व्यसन असलेल्या पतीने पत्नीची लाकडी बाबूंने मारहाण करुन हत्या केली होती. याप्रकरणाची माहिती मिळताच भादवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चार तासांमध्येच मालवणी येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने दारु पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केली,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्याकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!