NIA Raid

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

515 0

पुणे : महाराष्ट्रात इसिस मॉड्युलशी संबंधित प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने पुन्हा एकदा पुण्यात (Pune NIA Raid) मोठी कारवाई केली आहे. एनआयएकडून पुण्यामध्ये दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. एनआयएकडून कोंढवा आणि मोमीनपुरा भागात छापेमारी करण्यात आली आहे.

कोंढवा तालाब फॅक्टरी परिसरात असलेल्या इसेन्शिया सोसयटीमध्ये शोएब अली शेख याच्या घरी एनआयएने छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये त्याच्या घरातून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत मोमीनपुरा येथे असलेल्या गुलमोहर सोसायटीमध्ये अन्वर अली याच्या घरी देखील छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यामध्ये मोबाईल लॅपटॅाप आणि एक सत्तूर जप्त करण्यात आला आहे. एटीएसच्या मदतीने ही छापेमारी करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रीय तपास संस्थेने एकाचवेळी देशभरामध्ये 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे ग्रामिण, ठाणे शहर, मीरा-भायंदर आणि कर्नाटकातील काही ठिकाणी एनआयएकडून छापे टाकण्यात आले होते. यामध्ये ISIS या दहशतवादी संघटेशी संबंधित 13 जणांना अटक करण्यात आली आहे.एनआयनएने पुण्यात दोन ठिकाणी, ठाणे ग्रामिणमध्ये 31 ठिकाणी, ठाणे शहरात 9 ठिकाणी, मिरा भायंदरमध्ये एका ठिकाणी आणि कर्नाटकातील एका ठिकाणी छापे टाकले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!