Jagdish Mulik

सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टी धारकांना मिळणार मोफत घर

4083 0

पुणे, 7 : डिसेंबर रस्ता रुंदीकरणामुळे विस्थापित झालेल्या सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टीधारकांना मोफत घर देण्याचे आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे कार्यासन अधिकारी प्रवीण तळेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन मंडळाच्या पुणे विभागाला दिले असल्याची माहिती माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.

मुळीक म्हणाले, विमान नगर परिसरातील सिद्धार्थ नगर येथे सन 2009 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने अतिमहत्त्वाचा रस्ता निर्माण करण्यात आला. यावेळी 169 रहिवाशांच्या झोपड्या हटवण्यात आल्या. त्यांची रवानगी ट्रानझिट कॅम्प मध्ये तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती. परंतु गेल्या 14 वर्षात त्यांना हक्काचे घर मिळाले नव्हते. त्यासाठी मी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी निर्णय घेऊन सहकार्य केले.

Share This News
error: Content is protected !!