Yuva Sangharsh Yatra

Yuva Sangharsh Yatra : आजोबा शरद पवारांनंतर नातू रोहित पवारांनी पावसातून केली युवा संघर्ष यात्रा

388 0

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा (Yuva Sangharsh Yatra) सध्या विदर्भात सुरू आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनामुळे रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा स्थगित केली होती. आज वर्धा जिल्हा पुलगाव येथे युवा संघर्ष यात्रेचे आगमन झाले. यादरम्यान पाऊस सुरु होता. आजोबा शरद पवार यांच्यानंतर नातू रोहित पवारही पावसात भिजल्याचे पाहायला मिळाले. आता या यात्रेचा रोहित पवारांना किती फायदा होतो हे पाहणे हे महत्वाचे असणार आहे.

अनियमित पावसामुळे खरीप हंगामात झालेले शेतीचे नुकसान, रब्‍बीच्‍या सुरूवातीलाच अवकाळी पावसाचा तडाखा, नुकसानभरपाईच्‍या वाटपातील दिरंगाई, शेतमालाचे घसरलेले दर असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांच्‍या ‘युवा संघर्ष यात्रे’च्‍या माध्‍यमातून ऐरणीवर आले आहेत. या यात्रेत काँग्रेस आणि शिवसेनेच्‍या नेत्‍यांनी सहभाग घेतला होता.

महाराष्‍ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना आमदार रोहित पवार यांनी तरूणांचे, बेरोजगारांचे मुद्दे घेऊन युवा संघर्ष यात्रा सुरू केली. 24 ऑक्‍टोबरपासून पुणे येथून सुरू झालेली ही यात्रा तब्‍बल 800 किलोमीटरचा प्रवास करून 12 डिसेंबरला नागपूर येथे पो‍होचणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!