Pune News

Pune News : खळबळजनक ! पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान 2 हँडग्रेनेड आढळले

551 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये मेट्रोसाठी सुरू असलेल्या खोदकामात जुना हँडग्रेड आढळला आहे. हँडग्रेड आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॉम्बनाशक पथकालादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
पुण्यातील बाणेर भागात ही घटना समोर आली आहे. मेट्रो कंपाऊंडचे खोदकाम करताना जुना हँडग्रेनेड सापडला आहे. अचानक हँडग्रेनेड सापडल्यामुळे कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर कामगारांनी याची माहिती पोलिसांना आणि बॉम्बनाशक पथकाला देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तो परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही हँडग्रेनेड जप्त केले आहेत.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी खोदकाम करत असताना आयशर संस्थेच्या परिसरात हे दोन गाडले गेलेले ग्रेनेड आढळून आले होते. त्यासाठी बॉम्बनाशक पथकाला बोलवून ते कंट्रोल ब्लास्टद्वारे नष्ट करण्यात आले आहे. बॉम्बशोधक पथकांकडून हे दोन्ही हँडग्रेनेड तिथल्या तिथेच डिस्पोज केले आहेत. या परिसरात हँडग्रेनेड कुणी पुरले याची माहिती समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

पुण्यात बॉम्ब सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही धायरी परिसरात जिवंत बॉम्ब सापडला होता. नंतर तो बॉम्ब बॉम्बनाशक पथकाने नष्ट केलं होता. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये इंदापूर तालुक्यात बॉम्ब सदृष्य वस्तू सापडली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

Mount Merapi Volcano : माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! येरवडा कारागृहाचे डॉक्टर संजय मरसाळे यांना पुणे गुन्हे शाखेकडून अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!