Pune News

Pune News : बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे-हर्षदा फरांदे

350 0

पुणे : पुणे (Pune News) शहारामध्ये मोठ्या संख्येने महिला गृहिणी बचतगटाच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन व विक्री करतात व त्यातून आपला उदरनिर्वाह चालवतात. परंतु जागेअभावी त्यांना त्यांच्या वस्तूंचे उत्पादन व विक्री करण्यात मर्यादा येतात या बाबत आज भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वात पुणे महानगरपालिका आयुक्त श्री.विक्रमकुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

पुणे महानगरपालिकेने क्षेत्रीय कार्यलयाच्या हद्दीत पुणे महानगरपालिकेच्या जागा सदर बचत गट महिलांना उपलब्ध करून दिल्यास त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीस बाजारपेठ उपलब्ध करुन सामान्य महिला भगिनींना अधिक सक्षम करता येऊ शकेल आठवडे बाजाराच्या धर्तीवर अशी काही योजना बचत गटासाठी राबवता येऊ शकते काय याचा विचार व अंमलबजावणी महानगरपालिकेने करावी तसेच पुण्यात जवळपास ११०० सार्वजनिक स्वछतागृहे आहेत ज्यापैकी बहुतांश स्वछतागृहे ही मोडकळीस आली आहेत ती तातडीने दुरुस्त करून त्याची वेळोवेळी स्वछता केली जावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या.

या शिष्टमंडळात फरांदे यांच्या सह महिला सरचिटणीस गायत्री खडके, आरती कोंढरे,उज्वला गौड, भावना शेळके ,शामा जाधव ,प्रियांका शेंडगे आदी उपस्थित होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

Mount Merapi Volcano : माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! येरवडा कारागृहाचे डॉक्टर संजय मरसाळे यांना पुणे गुन्हे शाखेकडून अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!