Kalyan Crime News : खळबळजनक ! बायको आणि मुलाची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
कल्याण : कल्याणमधून (Kalyan Crime News) माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपी पतीने बायको आणि मुलाची गळा दाबून हत्या करून स्वतःदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कल्याणमधील या घटनेमुळे एकच खळबळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हा एक खेळणी व्यावसायिक असून त्याने याबाबत त्याच्या भावाला माहिती दिली. त्यानंतर फरार झाला. या व्यावसायिकाने आपल्या सात वर्षाच्या मुलासह पत्नीची हत्या केली. दीपक गायकवाड असे आरोपी पतीचे नाव आहे.
https://twitter.com/Topnewsmarathi/status/1730936694231183454
कल्याण पश्चिम भागामध्ये रामबाग लेन नंबर तीन येथे दीपक आणि त्याचे कुटुंब वास्तव्यास होते. इथे तो त्याची पत्नी अश्विनी आणि मुलाग आदिराज यांच्यासोबत राहत होता. शनिवार 2 डिसेंबर रोजी त्याने त्याच्या भावाला फोन करुन माहिती दिली की, त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केली आहे. तसेच स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलगा आणि आईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दीपकचे कल्याणमधील नानूस वर्ल्ड हे महागड्या खेळण्यांचे दुकान आहे. पण तरीही दीपकने हे टोकाचे पाऊल का उचलले ? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस सध्या दीपकचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात मात्र मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर
Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला
Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक
IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी
Reservation : ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल
Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक
