Ajit Pawar And Supriya sule

Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

614 0

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत पवार विरूद्ध पवार (Supriya Sule) हा जंगी सामना महाराष्ट्रात रंगणार आहे. कर्जतमध्ये पार पडलेल्या शिबिरात अजित पवार यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मी लोकशाहीवर प्रेम करणारी विश्वास ठेवणारी नागरिक आहे. एखाद्या पक्षाने कुठून निवडणूक लढवावी हा लोकशाही अंतर्गत त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांच्या निर्णयाचे मनापासून स्वागत करते. आमची नाती आणि आमचं प्रोफेशन वेगवेगळे आहेत. लोकशाहीत कुणीतरी कुणाच्या विरोधात लढणार आहे. ही वैयक्तिक लढाई नाही, वैचारिक लढाई आहे. जनता ठरवेलच कोण जिंकणार मी याला लढाई समजत नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आले आहे. लोकसेवा हा आपला विषय असेल तर त्यात लढाई कसली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?

Satara News : इन्स्टाग्रामवरची खुन्नस रस्त्यावर निघाली; डॉल्बी स्पर्धेत बंदुका, तलवारी नाचवून तरुणांची हुल्लडबाजी

Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर

Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : ‘सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!